पहिला मुद्दा म्हणजे साध्या साध्या गोष्टींसाठी या आपल्या तथाकथित महान संस्कृती असलेल्या देशाला नियमांची गरज का लागते? कुठेही कचरा करू नये हा एक अतिशय साधा आणि माणसांना सहज समजेल असा विचार आहे. पण आपल्याकडे त्याचे पालन होत नाही, किंबहुना श्वास घेण्याइतक्या सहजतेने लोक कुठेही घाण करत असतात. सुशिक्षितपणा आणि सुसंस्कृतपणा यांचा कोणी संबंध जोडत असेल तर भारतीयांसाठीतरी हा नियम लागू होत नाही.
पश्चिम रेल्वेने नुकतीच नवी कोरी सुंदर लोकल रूळावर आणली. पण नतद्रष्ट थुंक्या मंडळींना त्याचे काहीही सोयरसुतक नाही. चित्रकाराला नवा कॅनव्हास मिळाल्यावर तो ताबडतोब रंगकाम करेल त्या उत्साहाने लगेच गुटखा तंबाखूचे किळसवाणे ओघळ खिडक्यांच्या बाहेर दिसू लागले आहेत.
कितीही आणि काहीही करा हम नही सुधरेंगे.
मयुरेश , तुम्हाला जी कळकळ वाटतेय ती आम्हालाही वाटतेय. पण बहुसंख्य बेशिस्त नागरिकांपुढे आपण हतबल आहोत.
असो.
एक सुधारणा सांगतो.मुंबईच्या महापौरांचे नाव डॉ. शुभा राऊळ आहे. शोभा राऊत नाही.