एकंदरितच मराठी भाषेबद्दल जर या site वर माहिती ठेवली तर फारच सोयीचे होईल. उदा. अ ते ज्ञ पर्यंत सर्व मुळाक्षरे, बाराखडी वगैरे.

मी लहानपणापासुन महाराष्ट्रात वाढलेल्या, (२० ते ३० वयोगटातल्या) अनेक मराठी लोकांना "अ ते ज्ञ" क्रमाने म्हणावयास सांगितले. केवळ २-३ टक्के लोकांना ते जमले. हे माझ्यासाठी धक्कादायक होते. ही परिस्थिती बदलता येईल का?