आय टी बद्दल जी चर्चा चालू आहे त्यात केवळ पैश्याचा भाग नाही. आय टी मुळे एक सामाजिक असमतोल निर्माण झाला आहे. आणी बोंब आहे ती त्याची!
एकाच घरातील दोन मुले, एक हुषार, गूणवत्तेत आलेला, त्याने अभ्यासासाठी वैद्यकीय क्षेत्र निवडले, गुणांनुसार चांगले महाविद्यालय देखील मिळाले.....! त्याचाच पाठचा भाऊ, र..ट...प करत खासगी महाविद्यालयातून अभियंता झाला. नशिब चांगले... आय टी च्या खोगिरभरतीत अमेरीकेत पोचला.तिथून आता मोठ्या भावाला पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पैसे पाठ्वतोय.....! ( ही सांगी-वांगी गोष्ट नाही!!! नागपूर् चे हे कुटुंब माझ्या माहीतीतले आहे)
मी वाहन उद्योग क्शेत्रातील नामांकीत कंपनीत काम करतो. आमच्याकडे आवड म्हणून नाणावलेल्या महाविद्यालयातील गुणवत्ताधारक (गुणवत्ताधारिका देखील... अन्यथा नसता वाद सुरू व्हायचा!) येतात. ५-६ महीन्यांत त्यांचेच वर्गबंधू- भगिनी जेव्हा अमेरीका वारी करतात तेव्हा त्यांना असे वाटते की चूक केली की काय? आणि १०% नवीन भरती वर्षदेखील पूर्ण करू शकत नाही!! आम्ही कीतीही प्रयत्न केला तरीही आय टी सारखा पगार देऊ शकत नाही. आम्हीच काय कोणतेही उत्पादन क्षेत्र ( manufacturing sector )देऊ शकणार नाही!