विटेकरजी,
तुम्ही म्हणता ते बरोबर असेल. परंतु इथे मी फक्त भाववाढीची जी बोंब चालू आहे, त्याबद्दल मत प्रदर्शित केले. आयटीच्या इतर असमतोलाबद्दल नाही. मी बंगळूरला गेल्यावर जेव्हा घर शोधत होतो तेव्हा एक एजंट मला म्हणाला की आयटी मुळे घराचे भाडे खूप वाढले आहे. आयटी कंपन्यांच्या आवारात जाण्याकरीता रिक्षा करायचा तर ते लोक अव्वाच्या सव्वा दर मागतात. तीच गत आता पुण्याची होत आहे.
लिहिल्याप्रमाणे मला बाजाराची जास्त माहिती नाही. जे थोडेफार माहित होते त्यावरील ते मतप्रदर्शन.
बाकी अमेरिकेची वारी केल्यावर लोकांना जास्त पैसा मिळतो तो चलनदरामुळे. तो ही कमी जास्त होत असतो. आणि त्या लोकांना आपण स्वस्तात आणि जास्त काम करणारे लोक मिळाले म्हणून. पण आधी लोकांना मिळणारा कामाचा मोबदला आणि आताचा मोबदला ह्यात कमी आली आहे.
ह्यातील चलनदराचा तर पूर्ण बाजारातच फरक पडतोय. पण कालच आवाज वाहिनीवर सांगितल्याप्रमाणे भारतीय अर्थव्यवस्था ही अमेरिकेच्या बाजारावर पूर्णतः अवलंबून नाही. तिला जास्त धोका नाही.