नमस्कार,

दुनियादारी हे पुस्तक माझ्या हाती नववीत असतांना पडले! आजही ते पुस्तक आणि वाचतांनाच्या आठवणी एखाद्या आवडत्या पदार्थाची चव रेंगाळत राहावी, अश्याच आहेत. सुशी टच बद्दल अनुमोदन.

आवर्जून नमूद करावेसे वाटते ते म्हणजे ह्या पुस्तकामुळे माझा मागच्या पिढीकडे पाहण्याचा दृष्टिकोण बराच बदलला. शिवाय, तो बराच रुंदावलाही. बरेच 'हवे' ते संस्कार अगदी 'वेळे'वर घडविल्याबद्दल मी ह्या पुस्तकाची नेहमीच आभारी राहीन

तुमच्या अनुभव सारखाच आहे, पण तुम्ही फार सुंदर मांडला आहे. पुन्हा पुन्हा धन्यवाद!

- चिन्नु