इतकी हृ्दयाच्या तळापासून लिहिलेली प्रतिक्रिया वाचून बरे वाटले. असे बोलल्यावर आमच्या कार्यालयातील ढुड्ढाचार्य म्हणतात 'अजून बालपण गेलेले दिसत नाही.

तरीसुद्धा प्रेम आणि प्रेमभंग ही इतकी गळा काढण्याची आणि टिपं गाळायची गोष्ट नाही असं पुन्हा पुन्हा वाटून गेलं. अर्थात कॉलेजवरच्या कादंबरीमध्ये प्रेमकथा नाहीत म्हणजे केमिस्ट्री प्रॅक्टिकलमधून टायट्रेशन काढून टाकणं किंवा सी प्लस प्लस च्या अभ्यासक्रमातून vtbl वगळण्यासारखं आहे.

ही रचना विशेष आवडली.