लेख चांगला आहे. माहितीपूर्ण आहे.

सुचवण्या -

सुरुवातीच्या परिच्छेदांमध्ये वरूणाला लघुग्रह का म्हटले आहे? लघुग्रह शब्दाचा शब्दशः अर्थ घेतला तर अर्थ योग्य असला, तरी खगोलशास्त्राच्या भाषेत लघुग्रह हे विशेषनाम आहे. मंगळ आणि गुरुदरम्यान एका पट्ट्यामध्ये फिरणाऱ्या लहान मोठ्या दगडांनाच लघुग्रह म्हणतात. प्लुटोबाहेरील कक्षांमध्ये फिरणारे गोल हे लघुग्रहांप्रमाणे लहान असले तरी त्यांना लघुग्रह म्हणून संबोधण्याचा प्रघात नाही.

बटुग्रहाच्या व्याख्येतील क भागामध्ये परिवलन मार्गा ऐवजी परिभ्रमण मार्ग हवे.

घनतेचे एकक किग्रॅ/मीटर क्यूब हवे.

हायड्रोस्टॅटिक इक्विलिब्रियम साठी द्रवस्थैतिक वा द्रवस्थितिक संतुलन हा शब्द योग्य ठरावा.

छिद्रमय ऐवजी सछिद्र शब्द योग्य ठरेल असे माझे मत.

शुद्धलेखन करणे गरजेचे आहे.

ता. क.: माझ्या लेखांची आठवण ठेवल्याबद्दल धन्यवाद.