निरोप काढून टाकला आहे असे वाचून बरेचदा निराशा होते. असे प्रतिसाद कायमचेच काढून नाही का टाकता येणार?

स्वतः लिहिलेला निरोप पूर्णपणे काढून टाकण्याची सुविधा पुरवावी. कारण जुन्या प्रतिसादात बदल केल्याने तो बदल ताजे लेखन या सदरात येत नाही व त्या पानावरही फक्त मथळा स्वरुपात दिसतो. असे बदल दुसऱ्या नव्या प्रतिसादात लिहुन तो जुना प्रतिसाद पूर्ण नाहीसा करता येईल काय? किंवा नुकतेच बदल केलेले प्रतिसाद ताजे लेखन सदरात नव्या प्रतिसादात दिसतील असे करता येईल काय?

गरज - प्रतिसादांतील बदल लक्षात येणे.. अर्थात हे बदल निव्वळ शुद्धलेखनातील चुकांची दुरुस्ती नाहीत हे गृहीतक...उदाहरण - कोड्यांच्या उत्तरांची सध्य-स्थिती..यासाठी दरवेळी नवा, वेगळा प्रतिसाद लिहिणे अनावश्यक वाटते.

ही सोय आधीच पुरवली असल्यास वापरायची कशी?

मी आशुतोष