फक्त माझ्याबाबत बोलायचे झाल्यास मी स्वतः घरातल्या शक्य त्या प्रत्येक कामात या ना त्या प्रकारे पत्नी ला मदत करतच असतो. स्वयंपाकात सुद्धा. ती हाऊसवाईफ आहे. तरीही. या ना त्या प्रकारे म्हणजे असे:- स्वयंपाकात पूर्णपणे शक्य झाले नाही तर आणि मला वेळ असला तर, भाजी चिरून देणे, कांदा बटाटा चिरून देणे, स्वयंपाकाला लागणाऱ्या वस्तू कपाटातून काढून देणे. अहो ज्याला करायचे असते तो हर प्रकारे मदत करतो आणि नसेल करायची तो नाहीच करणार. स्त्रीया ही काही कमी नसतात.
कुंकू आनी मंगळसुत्र स्त्रियानांच का? असे तुम्ही विचारले आहे.
माझ्या माहितीप्रमाणे, मी असे उत्तर देवू शकतो की शेवटी काहीही म्हटले तरी, स्त्री हे सौंदर्याचे प्रतिक आहे. (तेही आवडत नसेल तर निसर्गाकडे किंवा देवाकडे तक्रार करा.की आम्हाला असे शरीर का दिले म्हणून?) त्यामुळे पूर्वीपासूनच सजणे नटणे हे आलेच. आणि सजणे नटणे स्त्रीयांनाच शोभते. त्यामूळे दागिना म्हणून स्त्रीने मंगळसूत्र, कुंकू वगैरे घालायला सुरुवात केली असावी. तुमच्या म्हणण्याप्रमाणे पुरुषांनाही लग्न झाल्याचे प्रतिक म्हणून काहीतरी कायम घालायला द्यायला हवे. बरोबर? आता राहीला प्रश्न योनीशुचीतेचा तर आजकाल डॉक्टर सांगतात की व्यायाम वगैरे मुळे योनीपडदा लग्ना-आधी फाटलेला असू शकतो, मग पुरूष तरी कसे समजू शकेल की पत्नीचा या आधी कुणाशी शरिरसंबंध आलेला आहे किंवा नाही ते?
तुम्हाला म्हणायचे आहे की लग्न झालेला पुरूष हा बाहेर दुसऱ्या स्त्री जवळ सहज जावू शकतो कारण लग्न झाल्याचे त्याचेजवळ काही प्रतीक नसते. अहो पण जरी स्त्रीयांजवळ मंगळसूत्र असले, तरी तीला जर समजा विवाहबाह्य संबंध ठेवायचेच असतील, तर ती ते मंगळसूत्र पर्स मध्ये गुंडाळून ठेवून किंवा ते तसेच गळ्यात ठेवून दुसऱ्या पुरुषाशी संबंध ठेवू शकेलच की!
आणि जो पुरुष एकपत्नीव्रता असेल तो लग्नाचे प्रतीक जवळ नसून सुद्धा कोणाही स्त्री कडे बघणार नाही. शेवटी ते स्वभावावर किंवा संस्कारांवर अवलंबून आहे. म्हणजे लग्नाचे वस्तू रूप प्रतीक असले नसले तरी त्याचे मनातले प्रतीक महत्त्वाचे आहे.
आणि तुम्ही म्हणता त्याप्रमाणे समजा एखादा पुरुष लग्ना-आधी सेक्स चा अनुभव घेवून चुकला असेल तर त्यात सामील असलेली ती स्त्री/मुलगी पण आहेच की. म्हणजे प्रमाण जवळपास बरोबर आहे. म्हणजे त्यात स्त्री आलीच की. आणि जर स्त्रीयांना अगदी पूर्णपणे पुरूषांची बरोबरी करायची आहे तर मग प्रत्येक ठीकाणी आरक्षण कशाला हवे? बसमध्ये बसायला आरक्षण का हवे? तुम्ही पण धक्के, खस्ता खात खात घाम गाळत जा ऑफिसला!! उभे राहा रांगेत. पुरुषांप्रमाणे. पुढे पुढे देवाजवळ मागणी करा की आम्हाला ९ महिने गर्भाला पोटात ठेवायचे नाही. त्यापासून मुक्ती हवी.... तेच एक आता बाकी आहे.