श्री निमिष यांनी लिहीलेले दोन प्रतिसाद परस्परविरोधी वाटतात :

(१) ती पुरूषांच्या बरोबरीने सगळ्या क्षेत्रात वावरते पण शेवटी स्वतःच्या सुंदर शरिराचा उपयोग करून पुरुषास आकर्षित करून त्याचेकडून काम करून घेते. मग याला स्त्री मुक्ती म्हणता येईल का? शेवटी ती तिच्या स्त्रीत्वाचा फायदा घेवून पुरुषाला जिंकून त्याचीच एक प्रकारे गुलामी करते ना! आखूडात आखूड कपडे घालून मिरवणे ही नक्कीच स्त्री मुक्ती असू शकत नाही.

(२)कुंकू आनी मंगळसुत्र स्त्रियानांच का? असे तुम्ही विचारले आहे.

माझ्या माहितीप्रमाणे, मी असे उत्तर देवू शकतो की शेवटी काहीही म्हटले तरी, स्त्री हे सौंदर्याचे प्रतिक आहे. (तेही आवडत नसेल तर निसर्गाकडे किंवा देवाकडे तक्रार करा.की आम्हाला असे शरीर का दिले म्हणून?) त्यामुळे पूर्वीपासूनच सजणे नटणे हे आलेच. आणि सजणे नटणे स्त्रीयांनाच शोभते. त्यामूळे दागिना म्हणून स्त्रीने मंगळसूत्र, कुंकू वगैरे घालायला सुरुवात केली असावी.