पण हो अजुनही स्त्री मुक्त  नाही किती तरी   बंधने आहेत तिला.

हा विषय मांडताना स्त्रीला कुठली बंधने आहेत आणि ती किती मुक्त आहे ते  स्पष्ट करा नाहीतर उगाच स्त्री ही रडत बसल्यासारखी वाटते.

२.कुंकू आनी मंगळसुत्र स्त्रियानांच का?

यावरून वपुंच्या एका पुस्तकात वाचलेल :- कुंकू,मंगळसूत्र,पांढर कपाळ ह्या खुणांवरून अंदाज करण्याचे दिवस कधीच संपले. हल्ली संपुर्ण मोत्यांच्या माळेत मानेमागे,वेणीखाली लपेल असा एकच काळा मणी असतो.नवऱ्याच स्थान किती हे ह्या फॉशनवरून समजत,पण नवरा आहे की नाही समजत नाही.

यावर तेवढतरी का हा युक्तीवाद नको कारण अलंकारांची दुकान स्त्रीयांमुळे अधीक चालतात.