पाश्चात्य विचार किंवा तत्त्वज्ञान अशा संज्ञा पाश्चात्यांनी पूर्वेकडे (म्ह. भारत, चीन, जपान इ) काही तत्त्वज्ञाने आहेत, ती आपल्याहून वेगळी आहेत हे जाणवल्यावर वापरायला सुरूवात केली. त्या आद्य पाश्चात्य विचाराचा भूगोल केवळ युरोपापुरताच मर्यादित होता. अमेरिकेची भर त्यात नंतर पडली. तसे पहायला गेले तर आफ्रिका, बुरखेधारी आखाती देश हेही 'आपल्या' पश्चिमेलाच आहेत. पण पाश्चात्य म्हणतो तेव्हा आपल्याला ते अभिप्रेत नसतात. कारण संज्ञा ही आपल्या दृष्टीकोनातून आलेली नसून पश्चिमेकडून आलेली आहे.