हे कुठेतरी बदलले पाहिजे

कुठेतरी म्हणजे कुठे? आपापल्या घरातच की. हल्ली जे सबलीकरण, सक्षमीकरण वगैरे शब्द ऐकू येतात ते याच्याच संदर्भात. आपल्याला काय हवे आहे हे स्त्रीला सांगता यायला हवे. त्यासाठी आत्मविश्वास हवा. त्यासाठी स्त्रीने 'कमावते' व्हायला हवे. आणि दुसरे म्हणजे आपल्या मुलग्यांना इतर स्त्रियांशी समानतेने वागणे शिकवायला हवे.