तुम्हा सगळ्याना एक सांगायचे आहे, या लेखाचे प्रयोजन, आहे की जे कोणी पुरुष अजुनही बायकोला मतस्वातंत्र्य देत नाही त्याने हे लेख वाचून सुधारणा करावी. मी सहमत आहे की काही घरी परिस्थिती बदललेली आहे. मी सध्या अमेरिकेत राहते पण अजुनही स्त्री मानसिक द्रुष्या स्वंतत्र नाहि. नव्या युगानुसार तिच्या मागण्या बदलल्या आहेत, आता ती बाहेर पडु शकते पण तिला तिच्या मतानुसार वागता येत नाही , पुन्हा सांगते जे कोणी पुरुष यात बसत नाही त्यांनी दुसऱ्यांसाथी समजुतीच्या स्वरात लिहावे, स्त्रियांनी त्यांना काय हवे ते लिहावे हाच उद्देश.

मला स्वःताला कूंकू आणी मंगळसुत्र याचा अभिमान आहे जेव्हा भारतीय स्त्री ते वापरत नाही तेव्हा वाईट वाटते पण जेव्हा चुकून राहिल आणि तिला टाकून बोललं जात तेव्हा ते बंधन वाटतं. मला वाटतं जे कोणी कुंकू न लावण्यांचा उद्दार करतो तर आपल्या देशात प्रत्येक गोष्टीला कारण आहे, कुंकू लावलेली,मंगळसूत्र असलेली मुलगी कॉलेजमध्ये दिसली कोणी फालतू पट्वण्याचा प्रयत्न करू नये म्हणून. येथे अमेरिकेत काय फरक पडतोय. मग मला या सगळ्या अंधश्रद्धा वाटतात.

आणि जेव्हा नवरा जिवंत चे प्रतिक कूंकू  लावले नाही तर नवरा रागवला तर हसू येत कि, स्वःतासाथी हा त्याचा आटापिटा असतो. ही जिवंत उदाहरणे आहेत माझ्या आजुबाजूची. तिला तिचे मतस्वातंत्र नाही , जेव्हा ती तसे वागायला जाते तेव्हा तिला तिच्या आईवडिलांना तक्रार करण्याची धमकी दिली जाते, जे तिला तिचे बरोबर असुनही नको असते, कारण तिला सुखी असल्याचे नाटक कायम करायचे असते.

लग्न झाले की बायको कधी नवरयाला त्याची मते , विश्वास बदलण्याचा अट्टाहास करत नाही पण बहुतेक नवरयांना बायकोने तसे केलेले चालत नाहि. माझी एका शेजारिणीला सफेद रंगाचे कपडे फार आवडतात पण लग्नापासून तिला तिच्या नवऱ्याने आवडीचे बलिदान द्यायला लावले की आमच्या घरात सफेद रंग सुवासिनी बाया वापरू शकत नाहि. बर ती तिची आवड दुर करू शकते पण प्रेमासाथी , जेथे दोघांमध्ये फक्त शारिरीक प्रेम उरते तिथे तिला मुरड का घालावी वाटेल?

याला काय म्हणावे जेव्हा परदेशात उच्च पदवी घेतलेले असे वागतात तेव्हा कपाळाला हात लावून बसावे वाटते. आपण समजावयला जावे तर चालत नाही. मग काय करावे ९११ दाबावे की हा तिच्या आवडीनिवडीवर गदा आणतो. स्त्री ही आज स्वसमथ्र आहे तिला मत्स्वांतत्र्य हवे आहे.

जेव्हा तिही नवरयाच्या बरोबरीने काम करते तर तिने प्रत्येक कामात नवरयाची साथ मागितली तर बिघडते ? ती एकसारखी राबत असते , किचन, झाले की मुलांनचे, ते झाले की जॉबचे, अजून मध्ये नवरयाच्या मागण्या चालुच असतात.

काय वाटते तुम्हाला या बद्दल , काय करावे तिने? हा कोंडमारा कसा सुटेल?