'इंटरेस्टिंग' ला प्रतिशब्द -सुरस किंवा सरस (रुचिपूर्ण अशा अर्थाने) चालतील का पाहा.

विषय चर्चेच्या दृष्टीने अतिशय आह्वानात्मक आहे. मला वैयक्तिक रीत्या असं वाटतं की प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाच्या मनात दडलेलं आहे. आपलं शरीर म्हणजे सृष्टीचं प्रतिरूप (रेप्लिका) आहे. त्यामुळे मनाची शक्ती वाढवत वाढवत नेली की सृष्टीतल्या बऱ्याच कोड्यांची उकल केवळ चिंतनातून व्हायला काही हरकत नसावी. शेवटी विज्ञान आणि तत्त्वज्ञान एका बिंदूला येऊन मिळतातच.

पण तरी चर्चा व्हायला हवी!