केशवराव हझलेसही सोडत नाहीत !

जरी अजूनी दुपार आहे,
'बसा'वयाचा विचार आहे ...
-चालू द्या! जमल्यास आमच्या नावाने थोडे तर्पण करा. तेव्हढीच आमच्या तृष्ण आत्म्यास शांती लाभेल.

कसा करावा विचार पुढचा
'हिचा' मिळाला रुकार आहे

-इथे जरा गोंधळ दिसतोय. रुकार मिळाल्यावर "कसा करावा विचार पुढचा" ही किंकर्त्यवमूढ स्थिती का बरं ?

(जपून पाडा जरा कविता
तयार "केशवसुमार" आहे!)

-तुम्ही तर भलतेच 'तयार' असता.

विडंबन आवडले. देव तुमच्यावर सदैव कृपावंत राहो व तुम्हास नवनवीन कविता मिळत राहोत.