मराठीचे बऱ्यापैकी वाचन असूनही व ललितचा कायम वर्गणीदार असूनही 'सुशी' हा लेखक व त्याची पुस्तके अजून वाचनात आली नाहीत. हा लेखक पुण्यापुरता मर्यादित तर राहिला नाही? टपोरी , कट्ट्यावरची भाषा परिणामकारकपणे वापरणारे माझ्या माहितीतले पुस्तक म्हणजे भालचंद्र नेमाडे यांचे 'कोसला'. कुणी मनोगती या लेखकाची व त्याच्या पुस्तकांची अधिक माहिती देईल का?