" छान गाणे आहे ना? पण ही अवघी तीनच कडवी आहेत. पुन्हा पुन्हा ऐकले तरी समाधान होत नाही. अजून एक दोन कडवी असती तर मजा आली असती. पण तसे नाही ना...    कुणाला पुढे कडवी रचता येतील का?"


हेमंत, आमंत्रणाबद्दल आभार.

एखाद्या भरजरी वस्त्राला जोडकाम करताना हात थरथरण्याचा अनुभव यावा, तसं काहीसं होतंय. तरीही, हे अप्रतिम गीत पुन्हापुन्हा ऐकल्यावर मनात आलेले आणि आजवर तिथेच ठेवलेले काही प्रश्न विचारायचा मोह आवरत नाही :


ह्या कवीच्या अंतरीचा ध्यास तू आहेस का ?
संगीताच्या बंदिशीचा नाद तू आहेस का ?
ह्या स्वरांच्या स्पंदनातील श्वास तू आहेस का ?
रसिकहृ्दयी उमललेली साद तू आहेस का ?


बघा , कसं वाटतंय...