राजकीय मते पटोत वा न पटोत, संपूर्ण राजकीय परिस्थितीचे तुम्ही केलेले सिंहावलोकन वाचनीय आहे. नेहमीच्या वर्तमानपत्रांत येणारे अशाप्रकारचे लेख कुठल्यातरी राजकीय पक्षाचा (छुपा) चष्मा लावून लिहिल्यासारखे वाटतात. त्या पार्श्वभूमीवर तुमचा लेख निपक्षपाती वाटतो. (शेवटी मात्र तुम्ही बसप च्या बाजूने झुकलेले आहात अशी शंका आली.) पण लेख लिहिताना तुम्ही एकदम १२ बोअरची बंदुक घेऊन फैरी झाडल्या आहेत, त्यांत जखमी झालेली अनेक श्वापदे तुमच्या मागावर येऊ शकतात.
पण एकूणच लेख मन विषण्ण करणारा आहे. यातून एक गोष्ट स्पष्टच आहे की युत्यांचे राजकारण चालूच राहणार आहे. कोणीही सत्तेवर आला तरी सामान्य माणसाला म्हणजे पर्यायाने महाराष्ट्राला वाईटच दिवस आहेत. सत्तेचे हे दलाल या देशाच्या मानगुटीवरून कधीतरी उतरतील का ?