सुंदर कविता, नीलहंस.
धारदार उपहास, टोकदार उपरोध असलेली ही रचना मनापासून आवडली.
विसुनानांच्या कवितेने कविवर्य बा. सी. मर्ढेकरांच्या कवितेची आठवण दिली होती; पण त्या कवितेत त्यांचा स्वतःचाही रंग होता. तुझ्या या कवितेनेही मर्ढेकरांची आठवण जागवली; पण तुझ्याही कवितेत तू स्वतः मला अनेक जागी दिसलास. फार छान कविता. वेगळ्या प्रतिमा-प्रतिकांची. वेगळी रचना सादर केल्याबद्दल धन्यवाद. (लयीकडे जरा लक्ष दे मात्र !)