महाराष्ट्राच्या राजकारणावरील लेख फार आवडला. इतरत्र नंदीग्राम, कम्युनिष्ट, गोध्रा वगैरे वाचून महाराष्ट्रात सगळे सुंदर चालले आहे असा समज झाला होता.
सावरिया, ओम शांती ओम व ष्टार व्हॉईस ऑफ इंडियाचे क्लिपिंग परतपरत दाखवून कंटाळलेल्या मराठी वृत्तवाहिन्यांवर बसपची मुंबईची सभा जोरदार झाल्याचे अखेर दिसले. कानपूर येथे आंबेडकर पुतळा विटंबना व खैरलांजी प्रकरणानंतर पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या गोंधळाच्या वेळेसच बसपचे हत्तीवाले निळे झेंडे प्रकर्षाने दिसले होते. तेव्हाच बसपची शक्ती इथे वाढत आहे हे पटले होते. आजच्या सभेमुळे बसपच्या शक्तीवर शिक्कामोर्तब झाल्यासारखे वाटत आहे. रिपब्लिकन नेत्यांच्या नाकर्तेपणामुळे कंटाळलेली आंबेडकरी जनता बसपमागे जाणार यात काहीच शंका नाही.