मृदुला,

बटाटा नवा असेल तर कधी कधी चिकट होतो. बटाटा घेतानाच जुना बघून घ्यावा. (कुठल्याही रेसिपीत). उकडून थंड झाल्यावर साले काढून त्याच्या फोडी करून त्या फोडी कुस्करून घ्याव्यात. बटाटा ताटात काढून तळहाताने दाबून त्याचा लगदा करू नये. अगदी मऊ लगदा करू नये.

दुसरी एक शंका. बटाटे पाण्यातून बाहेर काढून, फक्त बटाटे कुस्करले की पाण्यासकट कुस्करले? तसे तुम्ही करणार नाही मला खात्री आहे पण 'खळी'सारखे हा शब्दप्रयोग केल्यामुळे ही शंका आली.

धन्यवाद.