उद्दामपणे "ही आमची पहिलीच वेळ होती" असं सांगून जो केलेल्या चुकांवर पांघरूण घालायचा प्रयत्न केला आहे तो अश्लाघ्य आहे. ग्राहक हा देव आहे असं मानणाऱ्यांनी देवाच्या कामात छोटिशी चुकही ठेवता कामा नये. इथे तर धादांत फसवणूक तर आहेच पण वर निर्लज्ज सारवासारव आहे.
झाल्या प्रकाराबद्दल माफी मागून हे संपवता आलं असतं पण ही नंतरची मिजास आहे ती उतरली पाहिजे. म्हणजे चुक करायची ती करायची आणि वर परिणाम भोगणाऱ्यालाच सुनवायचे हे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा झाल्या. तसंही त्यांची लोकप्रियता हा वादजन्य मुदा आहे. ती आहे असं धरलं म्हणून त्यांना वाटेल तसं वागायचा परवाना मिळत नाही.
माझ्या मते प्रत्येकाने निशेधपत्र लोकसत्ताला पाठवलं पाहिजे. निदान मी तरी पाठवत आहे.
-ऋषिकेश