नंदीग्राम मधील अत्याचार हा एक भाग झाला. असे असंख्य लाठीमार, गोळीबार या देशात दरवर्षी होत आहेत. माणसे अशीच मरत आहेत आणि मारली जात आहेत. आपण ब्रिटिशांना दुष्ट मानतो , याचे कारण शालेय इतिहासाच्या पुस्तकातील एकतर्फी लिखाण. आपण एक जालियनवालाबाग हत्याकांड सतत उगाळत बसतो. मग सध्या जे चालले आहे ते काय चांगले आहे? ब्रिटिशकालीन व आजचा भारत यावर स्वतंत्र लेख लिहावासा वाटतोय. सध्याच्या या देशी राज्यकर्त्यांपेक्षा गोऱ्या ब्रिटिशांचे राज्य अधिक कल्याणकारी होते असेच खेदाने म्हणावे लागेल.