छायाताईंच्या पत्राला सचिन ट्रॅव्हल्सच्या कार्यकारी अधिकाऱ्यांचे उत्तर अत्यंत निर्लज्ज आणि पोरकट वाटले.
कोणताही कार्यक्रम आयोजित करताना (मग तो भले फुकट का असेना...) तो सर्वांगसुंदर आणि व्यवस्थित झाला
पाहिजे याची संपूर्ण जबाबदारी संयोजकांची असते, इतकी साधी जाणीव त्यांना नसावी?
असा कार्यक्रम आपल्याकडून होऊ शकणार नाही असे त्यांना वाटत होते तर त्यांनी सर्वच प्रेक्षकांचे पैसे परत करून
त्यांची माफी मागितली असती आणि पुढच्यावेळी चांगले संयोजन करून कार्यक्रम यशस्वी केला असता तर त्यांना खरोखर
आपल्या अब्रूची चाड आहे असे दिसले असते.
त्याउलट, लोकांनी पैसे परत मागितले नाहीत याचा सोयिस्कर अर्थ 'कार्यक्रम लोकांना आवडला' असा काढण्याचा प्रयत्न
सचिनने केला आहे.
शिवाय 'चेक नेला पण कॅश केला नाही' यावर अत्यंत वाईट टिप्पणी करून उरलीसुरली सहानुभूतीही गमावली आहे.
जाहिरातदार या निकषावर लोकसत्तेने हे लंगडे समर्थन कोणतेच संपादन न करता छापावे हेही लांच्छनास्पद.