म्हणजे इतका विनोदी चित्रपट असला तरी एक विदूषक लागतोच. एक महत्त्वाचे उपपात्र (जे काम शक्ती कपूर, कादर खान, अनुपम खेर, जॉनी लिवर आणि गेला बाजार असरानी) जे ओढूनताणून विनोदी आहे ते टाकता येईल.
जसे, गोपालचा शेजारी. त्याला एकच वेड. दररोज रंगीत आडनावे लावणे. एक दिवस काळे, दुसऱ्या दिवशी गोरे, हिरवे, लाल, भगवे. त्या त्या दिवशी तो त्यात्या रंगाचे कपडे घालून घराबाहेर पडतो. म्हणजे आडनाव हिरवे असले की हिरवी टोपी, हिरवा चष्मा, हिरवा शर्ट, हिरवी प्यांट, हिरवे बूट आणि तोंडात गाणं - हिरवे हिरवे गार गालीचे.... (ही आयडीया नवी नाही, ढापलेलीच आहे कोण्या एका चित्रपटात कादर खान एकेका दिवशी गुंगा, अंधा, बहिरा असतो. अर्थात आयडीया ढापूनच नवे चित्रपट बनतात आणि यापेक्षा टुकार आयडीया ढापायला मिळाली नाही.)
तर, याचा आणि कावळा, गाढविणीचा ३६ चा आकडा. का तर कावळ्याला वाटते की गाढविणीवर याचा डोळा आहे. त्यामुळे कावळा हा माणूस घराबाहेर पडला की नेम धरून त्याच्या खांद्यावर शिटतो. मग दोघांचं भांडणं - हा माणूस हिंदी चित्रपटाला साजेश्या शिव्या उच्चारतो. 'उल्लू के पठ्ठे, तेरी माँ की आँख!' (ही शिवी अगदी चालबाझमधल्या रजनीकांतप्रमाणे म्हणतो.)
आपल्याला घुबडाचं पोर बनवल्याबद्दल कावळा नाराज, त्यातून एकाक्ष आईच्या डोळ्याचा उल्लेख केल्याने अपमानित. मग कावळाही तोंड उचकटतो आणि म्हणतो, "काव! काव! काव" (म्हणजे, रागव! रागव! आणखी रागव!) आणि हा माणूस आणखीच कावतो.
हा सीन चित्रपटात प्रत्येक २० मि. च्या इंटरवलने येतो. हाच प्रसंग, हेच संवाद फक्त कपड्यांचे रंग बदललेले असतात.
----
बाकी, लेख मस्त! चित्रपट सुपरहिट! प्रिमिअरच्या सोहळ्याबद्दलही लेख टाकता येईल.