"......समजावते. गोपाल आपले मन बदलून तिला आत घेतो. ते मंगळावर उतरतात आणि यानातलं पेट्रोल संपून ते तिकडे अडकतात. पाऊस पडायला लागतो आणि नायिका पावसात भिजून गाणं म्हणते. 'आय नो माय गोपाल इज काला, बट आय लव्ह हिम बिकॉज ही इज दिलवाला, मंगलपर हमारे प्यार को लगा है ताला, पहनादो मुझे हिरोंकी माला, आय हॅड अ क्रश ऑन धोतरवाला, जोइये नथी हमे पेट्रोल टँकरवाला'(गाण्यात हिंदी व इंग्रजीबरोबरच 'धोतर' हा मराठी शब्दही वापरून आम्ही महाराष्ट्राचा जाज्वल्य अभिमान दाखवला आहे. तसेच दोन गुजराती शब्द वापरून गुज्जू बांधवांनाही चित्रपट आपला वाटेल अशी व्यवस्था केली आहे. या गाण्यासाठी आम्ही २ कोटी रुपये खर्च केला आहे. अंतराळपोशाखातल्या शंभर सुंदर विदेशी नृत्यांगना मंगळावर साल्सा नाचताना दाखवल्या आहेत. चित्रपटातील हे महत्त्वाचे गाणे आणि शीर्षकगीत आहे आणि हे खूप गाजणार आहे.) ...."

या गाण्यातल्या कपड्यांची आयडिया आणि लोकेशन "I think I did it again.." या ब्रिटनी च्या गाण्यावरून उचलेली वाटते.. खुद्द गाण्याच्या ओळी सुद्धा इंग्रजी गाण्यासारख्या वाटतात.. तुमच्यावर कॉपीराईट भंगाची कारवाई का करू नये. स्पष्टीकरण द्यावे.

आपला,

-कोलंबिया मुझीक हाऊस.

(आजकाल प्रसिद्धीसाठी अशी कारवाई ही व्हावी लागते. आठवा "पार्टनर" पिक्चर)