सॉलीड लिहिलेले आहे. अतिशय गांभीर्याने आणि मेहनतीने लिहिलेले दिसत आहे.
कथानकात खरोखरच बरीच गुंतागुंत आहे आणि ती अगदी तपशीलाने लिहिलेली आहे. विक्षिप्त गोष्टींचे मिश्रण इतक्या सातत्याने आले आहे आणि त्यांच्यातील हास्योत्पादकता जराही कमी होत नाही. अशा लेखनात जराही ढिलाई झाली तरी पकड निसटण्यचा धोका असतो, तो अनुताईंनी यशस्वीरीत्या टाळलेला आहे, असे वाटते. कथानक, पात्र योजना, प्रसंगांची आखणी हे पाहता अनुतई खरोखरच एखादी अशी औपहासिक पटकथा लिहितील असे वाटते. (मॅड नियतकालिकात असतात त्याप्रमाणे)
अनुताईंचे अभिनंदन.
(गोष्ट वाचत असताना इतके हसू आले की पलीकडच्या क्यूबमधील लोक बघायला आले. माडीवरची मंडळी खाली आली .. त्याप्रमाणे )