विसूनाना
जकातदारांच्या भाषेबद्दल म्हणाल तर मी विशेष अपेक्षा केली नव्हती. पण त्यांनी जाहीर माफी मागितल्यामुळे मात्र अनपेक्षित धक्का बसला. कारण आम्ही चार जणींनी २९ ऑक्टोबरला त्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये जाहीर माफीची मागणी केली होती, त्याला त्यांनी साफ नकार दिला होता.
लोकसत्तेने जकातदारांचे पत्र जसेच्या तसे छापले हे उत्तमच झाले. नाही तर जकातदारांचे हे रूप आपल्यासमोर येऊ शकले नसते. लोकसत्तेचे आभार मानावे तितके थोडेच आहेत, त्यांनी 'चांद मातला' लेखालाही व्यवस्थित स्थान दिले आहे. शक्य झाल्यास जास्तीत जास्त लोकांनी दोन्हीबद्दल आपल्या बऱ्या-वाईट प्रतिक्रियाही लोकसत्ता ला कळवायला हव्यात असे मला वाटते.
छाया