मी तरुण पिढीतील एक सदस्य आहे, आणि रेहमान, शंकर महादेवन, सोनू निगम या सारख्यांचे संगीत मला फार आवडते. पण तरीही पूर्वीच्या संगीतातील निरगसता अजून नवीन गाण्यात दिसत नाही / क्वचित दिसते असे वाटते...

'ए दिलरुबा, नजरे मिला', म्हणत हदयाचा ठाव घेणारी लता किंवा 'भवरा बडा नादान है' म्हणणारी अवखळ आशा, किंवा 'याद किया दिल ने कहा हो तुम' म्हणत भावपूर्ण होंणारा देव आनंद...

ह्या सर्व गाण्यात एक निरगसता / 'स्पिरिट' दिसून येतो, तो नवीन संगीतात दिसत नाही असे मला निश्चितपणे वाटते...   

आजही रेहमान सारखे बुद्धीमान संगीतकार आहेत, सोनू निगम, सुनिधी सारखे गायक आहेत, मग ती गोडी कुठे गेली???

'गुरु', मधील गाणी सुंदर आहेत, 'तेरे बिना' कर्णमधुर आहे, 'मय्या मैय्या' ने नश चढतो, हे खरेच...

पण 'ओ जानेवाले, हो सके तो लौटके आना' सारख्या गाण्यांत मनाची मलीनता दूर करून, मनाला शांत करण्याची शक्ती आहे ती नवीन संगितात नाही...