कथानक एकदम जबरा आहे. हसून हसून पुरेवाट. सगळाच कल्पनाविष्कार एकदम सुपीक

"गोका" एकदम हिट होणार हे लिहून घ्या. (हल्ली चित्रपटाचं नाव पूर्ण म्हटलं तर चित्रपट हिट होत नाहीत. OSO म्हणूनच हिट झाला, आणि सांवरिया म्हणूनच हिट झाला नाही. सांवरियाला नुसतं "S" किंवा सा म्हणू शकत नाही ना )

बाकी सुरुवातीलाच कावळ्याच्या डोक्यावर कॅमेरा पाडून त्याला यमसदनाची वाट दाखवल्याने त्या (सध्या काहीच उद्योग नसलेल्या) मनेका गांधीला मात्र भरपूर काम मिळणार आहे. कावळ्याच्या अंतिम कालाचे रिटेक्स करता करता किती कावळे कामी येतील हे काही सांगता येत नाही. पण पक्षी प्राण्यांवर चित्रपटात करण्यात येत असलेल्या अन्यायाचा सूड म्हणून गाढविणीला नायकाच्या आईला लाथ मारण्याची संधी दिली आहे हे सांगून मनेकाताईंच आंदोलन बंद पाडता येईल.

पोस्टरवर गाढवाच्या फोटोचा साईज नायक नायिकेपेक्षा मोठा दाखवला आहे ही गोष्ट देखील मनेकाताईंची समजून घालण्यासउपयोगी पडेल.

First Day First Show ची पहिल्या रांगेतली तिकिटं आत्ताच बुक करून आलोय. (पण त्या गाढविणीपासून सांभाळलं पाहिजे. मला ताप येणं सध्या परवडणार नाहिये )

जाता जाता : स्वित्झर्लंडच्या बागेचा उल्लेख वाचून आपल्या मराठी चित्रपटातली आरे कोलनीची बाग आठवली. एक एक झाड ओळखीचं झालं होतं. त्याच त्याच बागेतले लक्षाचे आणि अशोक सराफचे हिडीस नाच बघून भेजा पकला होता एकदम :-)