दक्षिणेत फिरतांना एकदा मजेदार अनुभव आला. नकाशावर नसलेला एक फाटा रस्त्यात आला. एर्नाकुलम? असे विचारल्यावर एकाने लेफ्ट पो असे म्हटले व हाताने उजवीकडची दिशा दाखविली. त्याला हिंदी वा इंग्रजी येत नव्हते. पुढे विचारायला कोणी नव्हते. आम्ही डावी दिशा घेतली. ५०० मीटरवर एक पूल लागला. २ रु. टोल भरला. पुढे गेल्यावर एक माणूस दिसला. त्याला विचारले. सुदैवाने त्याला मोडतोड इंग्रजी येत होते. त्याने आल्या मार्गाने परत पाठवून विरुद्ध वळण घेऊन जायला सांगितले. पुन्हा २ रु. टोल भरून परत गेलो. पण यावेळी रस्ता बरोबर होता. जरा पुढे एर्नाकुलम अमुक अमुक किमी असा मैलाचा दगड होता.