राजराव,
'हुज्जत घालणे' यात कोणताही वाईट अर्थ निघत नाही.इथे उल्लेख सिंधी माणसाचा होता म्हणून माझे एक निरीक्षण लिहीले. (गंमत अशी की या निरीक्षणावर 'इंडीयन लाफ्टर चॅलेंज' की जॉनी लिव्हरच्या एका कार्यक्रमात एक नक्कलही होती.)सिंधी माणसाची व्यवसायकुशलता इ. गुणांबद्दल कौतुक आहेच. 'जनरलायझेशन' करू नये हे मला पटते. पण या जनरलायझेशनचा विरोध करताना आपणही हमरीतुमरीवर येऊन मराठी घरांचे जनरलायझेशन करत आहात असेही वाटून गेले. 'जेवण करून आला असाल' हे एका महाराष्ट्रातील प्रांतातल्या लोकांच्या तोंडी टाकलेले वाक्य खरे की विनोदापोटी हे मी जाणत नाही.पण 'पाणी देउका' 'चहा घेणार का' किंवा तत्सम वाक्यात 'चहा घेणार की आणखी काही' असेही अर्थ असू शकतात.'पाणी देऊका' मी तरी कुठे ऐकलेले नाही.असो.
आपल्या मित्राच्या सिंधी बायकोची व आपली 'कोत्या वृत्तीने दुखावल्याबद्दल' क्षमा मागते.