जकातदार मराठी (म्हणजे त्यांचे आडनाव जकातदार आहे म्हणून व त्यांनी मराठी पेपरात मराठीत पत्र लिहिले म्हणून) आहेत असे समजले तरी समोरचा विक्रेता मराठी आहे की गुज्जू यावर ग्राहकाला होणाऱ्या त्रासाचे मोजमाप ठरत नसते. शिवाय एका अर्थाने यशस्वी ठरलेला मराठी माणूस धंदा करण्याचे असे उदाहरण समोर ठेवत असेल तर मराठी माणसाला धंदा नीट करण्याची अक्कल नाही ही बाब अधोरेखितच होईल.
तुमच्या ज्ञानाचा व अनुभवाचा संपूर्ण आदर ठेवून सांगतो की "तुमचा दाऊद तर आमचा गवळी" प्रकारचे हे समर्थन (मला तरी) वाटले.