अच्छा.... त्यांचे मराठीत अर्थ दिले आहेत का? आधी मला वाटले इंजिनियर हा शब्द आता मराठीत अधिकृतपणे समाविष्ट झाला. चला हे छान आहे.

एकाच वेळी २/३ बातम्या मराठीबद्दल, त्याही एकाच मराठी वृत्तपत्रस्थळावर. मराठीवर अधिकृतरित्या संकट आलेले दिसले. त्यामुळे गोंधळ झाला.
त्या बातम्या म्हणजे...

१. आता सेमी इंग्रजी पहिलीपासून 

२. ते वृत्तपत्रस्थळ म्हणते की "सायबर विश्वात मराठी भाषा आणि संस्कृतीला ताठ कण्याने उभं करण्याचा हा एक प्रयत्न आहे" आणि त्यांच्याच संकेत स्थळावर भरपूर विभाग इंग्रजी नावात आहेत. (त्याबद्दल त्यांना विपत्र पाठवले आहेच. उत्तर मिळण्याची शक्यता कमीच वाटते.)

आणि तिसरी बातमी हीच.