९९ टक्के सासू या कधीच सूनेची आई होवू शकत नाही

९९ काय, १०० सुद्धा म्हणता येईल. सासू आई होत नाही कारण आई ही एकच असते. असं ठरवून आई होणं, अगदी आपल्या दत्तक मुलांचं सुद्धा अवघड, तर २५/ ३० वर्षांच्या सुनेची आई कसे होता येईल. सासू नातवंडांची चांगली आजी असेल तर तेव्हढे पुरेसे आहे. बाकी निर्णयस्वातंत्र्य मिळेल अशा घरात लग्न करावे किंवा ते झगडून मिळवावे (किंवा सहनशील त्यागमूर्ती व्हावे!) उगाच आई वगैरे होण्याची अपेक्षा म्हणजे अतीच आहे.