सासूने आई कशाला व्हायला पाहिजे. आई सारखी वगैरे कल्पना पटत नाही. आई आहे किंवा नाही या दोनच शक्यता असू शकतात. मग सासूने फक्त 'चांगली' सासू व्हावे. तीने तीच्या मुलाचीच आई व्हावे. म्हणजे सूनेला न दुखवण्यात मुलाचे सुख आहे हे तीला कळेल. तसेच सुनेनेही सासुला आई न समजता पतिची आई समजावे आणि तीला शत्रू न मानता आपली जवळची वयाने आणि अनुभवाने थोर व्यक्ती समजावे. आणि सासू बरोबर चांगले संबध असतील तर पतिचे प्रेम आणि विश्वास पण मिळेलच.