चिंचा कुरतडताना.. वरून 'चिंच बोरं आवळे, हलकट मेले टवळे, कुठे शेण खाल्लंस' ची प्रकर्षाने आठवण झाली. पण तो दुवा काही दिसला नाही. बोकील साहेबांची ती सुंदर कविता मात्र आहे तिथे. असो. आताशा तुम्ही फक्त गझलांचे विडंबन करीत नाही, ही गझल लिहिणाऱ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे. काही ओळी वाचून 'मात्रा कसल्या ! मुळात मजला वृत्त नको आहे!!,' असे तुम्ही म्हटले होते तेही खरेच वाटते. असो. तुमचे पांढरपेशे विडंबन फार आवडले, हे सांगणे न लगे.