ही चर्चा वाचून छायाताईंचा मूळ लेख वाचला. (जकातदारांची प्रतिक्रिया वाचता आली नाही तरी..)
तिकिटाचे पैसे परत केले म्हणजे झाले का? लोकांना झालेल्या मनस्तापाचे काय? मंचाच्या अतिजवळ बसून मान, दणदणाटी आवाजाने डोके वगैरे दुखू लागले तर त्याची भरपाई कोण देणार? साध्या क्षमेच्या शब्दाने काम झाले असते पण असे शब्द आलेले नाहीत असे ही चर्चा वाचून वाटले.
मवाळपणाने पुन्हा पुन्हा जनतेला असे गृहित धरण्याचे प्रकार होतील. छायाताईंनी याविरुद्ध आवाज उठवला व मुद्दा लावून धरला याबद्दल त्यांचे अभिनंदन.