खरच अप्रतीम विष्लेषण केले आहे. अतिशय विचारपुर्वक लिहलेला लेख आहे वेगळे सांगणे नको. या निमित्ताने काही बेसिक मुद्द्यांचा ऊहापोह करावा वाटतो......

विधानसभेची निवडणूक जिंकण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वात तळात काम करणारी निस्वार्थी कार्यकर्त्यांची फळी व प्रमुख मतदार असलेल्या ग्रामिण मतदारांवर पकड.

खरा मतदार वर्ग म्हणजे "ग्रामिण जनता". साधारण्ता ७० % आमदार या भागातून निवडले जातात. ग्रामिण भागात मतदान कधीही पक्षाची ध्येय धोरणे, नेते मंडळी, कार्यक्रम यासारख्या गोष्टीवर अवलंबून नसते. या पुर्ण वर्गाची मदार असते ती म्हणजे त्यांचे स्थानिक नेते म्हणजे बहुदा "दुधसंघ, पतपेढ्या, बँका व तत्सम गोष्टीवर अवलंबून असते". ही गोष्ट जर लक्षात घेतली तर असे दिसेल की कॉग्रेस व रा. कॉ. ची या वर्गावर पुर्ण पकड आहे. त्यामुळे ते या भागातून यशाची अपेक्षा बाळगू शकतात.

भाजपाचा खरा मतदार वर्ग म्हणजे सुशिक्षीत व पांढरपेशा वर्ग. या वर्गाने आत्तापर्यंत भाजपाला खूप हात दिला आहे पण गेल्या काही काळातिल घटनामुळे हा वर्ग हळूहळू यापासून दूर जात आहे.

शिवसेनाच्या बाबतीत अंदाज व्यक्त करणे अवघद आहे. बाळासाहेबांचा करिष्मा कधिही कामाला येवू शकतो. पण नारायन राणे व राज ठाकरे गेल्यामुळे होनारे नुकसान भरून न निघणारे आहे.

मनसे साठी अजून बराच वेळ आहे. अजून त्यांच्याकडे ग्रामिण भागात प्रभावी काम करणारी कार्यकर्त्यांची फळी नाही. नुसत्या भाषणाने मते मिळत नहित हा धडा राजने त्यांच्या काकांकडून शिकायलाअ हरकत नाही.

महाराष्ट्रात कधिही जातिच्या आधारे मतदान होत नसल्याने तशी बसपाला जास्त संधी नाही.

एकंदरीत पुन्हा एकदा कॉ. किंवा रा. कॉ. अथवा आघाडी सरकार येण्याची शक्यता आहे.

रा. कॉ व शिवसेना यांच्यात काहीतरी सौदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही..........