मी लोकसत्ता सहसा वाचत नाही, पण इथे चर्चा वाचली आणि छायाचा लेख ही वाचला.

त्यांचा जो विरस झाला तो खरंच संतापजनक आहे, पण त्यांच्या संतापाला सचिन ट्रेव्हल्स कडून जे उद्धट प्रतिउत्तर आले, त्यातून सचिन ट्रेव्हल्स आपल्या ग्राहकाला देव समजतात की देवा समोर बळी द्याययला नेण्यात येणारा बोकड ते कळलं.

ह्या पूढे सचिन ट्रेव्हल्स चा उल्लेख कुणी केल्यास त्याला सावधतेचा इशारा नक्किच देईन.

छायाने पेटवलेल्या मशालीला पेटतीच ठेवायला माझा तेवढाच हातभार!!!