अहमदाबादला पहिल्यांदा जाण्याचा प्रसंग आला, तेव्हा जिला भेटायचे होते तिच्या कार्यालयात चौकशी केली.   ती आली नव्हती तेव्हा तिच्या घराचा पत्ता विचारला.  घर फार लांब नसले तरी सहज सापडण्यासारखेही  नव्हते.  तिच्या मैत्रिणीने कागदावर नकाशा काढून दिला आणि स्वतःची दुचाकीपण.  समोर पत्त्याचा कागद अडकवून दुचाकीवरून जाऊन योग्य ठिकाणी पोचायला जरापण अडचण आली नाही. वाटेत कुणालाही विचारावे लागले नाही. तेव्हापासून कुणी पत्ता विचारला की नकाशा काढून देण्याची सवय मला लागली.