मला वाटतं मुलगा की मुलगी न ओळखताही एखाद्याचं कौतुक करणं  अमेरिकेत फारसं कठिण नाही. अमेरिकेत अगदी लहान मूल १ - दिड वर्षांचे बाळ सोडले तर मुलगा की मुलगी हे ओळखू येणे सहज शक्य असते. उलट, भारतात ते कठिण होते. अमेरिकेत मात्र, मुलींचे कपडे, त्यांचे रंग (सहसा गुलाबी, पांढरे आणि इतर मृदू रंग) आणि मुलांचे कपडे (निळे, लाल, काळे आणि इ. भडक रंग) यावरून मुलगी/ मुलगा सहज ओळखू येते. या शिवाय, अगदी लहान मुलींचे केसही खांद्याखाली वाढलेले असतात. त्यांच्या चपला, बूटही वेगवेगळे असतात. (भारतात रंगसंगती आणि इतर गोष्टींना अद्याप इतके महत्त्व दिले जात नाही असे वाटत. चू. भू. द्या. घ्या.) तरीही, ओळखू येत नसल्यास -

हाऊ क्युट! स्वीट चाईल्ड असे म्हणता यावे.

बाकी, भाषेच्या गंमतींचा मुद्दा आवडला.

अवांतरः अमेरिकेत एखादा पुरुषही 'वी आर प्रेग्नंट' असे सांगतो कारण फक्त बाईच गरोदर असते असे सांगण्याची प्रथा आता जुनी झाली आहे.