खारीबद्दल ती दिसायला गोंडस असल्याने एक प्रकारचे आकर्षण वाटते आणि रामाच्या शाबासकीच्या दंतकथेवरून आपुलकी वाटते. पण जी गोष्ट वानरांची तीच खारिंची! (म्हणजे, रामाला हे प्राणी मदत करत होते, माणसाला फक्त त्रास देतात... असो, विषयांतर नको!)

खारींची प्रजाती उंदरांपैकीच आहे. ऊंदरांप्रमाणे पिकाचा फन्ना उडवणे, अन्न धान्याची नासाडी करणे, फळबागांची वाट लावणे, कोवळ्या कळ्या खाउन फस्त करणे, ही सर्व कामे करण्यात खारी तरबेज असतात. खारी दिसायला निरुपद्रवी आणि गोंडस असल्या तरी त्यी शेतकरी मंडळींचा शत्रुच असतात. उंदरांचा बंदोबस्त करण्याप्रमाणेच खारींचा बंदोबस्त करणे ही एक डोकेदुखी आहे! खारी उंदरांप्रमाणेच पावसाळा सोडून ईतर सर्व हंगामात आपली प्रजा ३ ते ४ च्या संख्येने वाढवत असतात. नऊ ते दहा महिन्यांचे खार प्रजोत्पादनास तयार होते! आता सांगा, बंदोबस्त करणे कठीण, प्रजोत्पादनाचा वेग हा असा, त्यांच्या संख्येत वीस वर्षांच्या काळात लक्षात येण्यासारखी भर पडणारच ना?

माझे निरिक्षण, अनुभव आणि ऐकीव माहिती याच्या जोरावर मी हे लिहिले आहे, चुक भुल क्षमस्व!