या कवितेमध्ये नायिका तिच्या शारीर अनुभवाचे आपल्या सखीजवळ वर्णन करीत आहे. सर्वसाधारणपणे असे मानले जाते की जरी स्त्रिया पुरुषाएवढ्याच समरसून शारीर अनुभव अनुभवतात तरी त्याचे शाब्दिक वर्णन (लेखी अगर तोंडी) करायला बिचकतात, संकोचतात अथवा टाळतात. एखादीच तस्लीमा नासरीन अथवा मेघना पेठे तसे करते तेंव्हा तिच्यावर भडकपणाचा, उत्तानपणाचा आरोप होतो. ती आपल्या अनुभवाशी आपल्या लिखाणात किती प्रामाणीक आहे हे पाहिले जात नाही.
ही कविता एका पुरुषाने लिहिली आहे, स्त्रीच्या भूमिकेतून. या निमित्ताने मला काही प्रश्न पडतात.
(१) ही कविता जर एखादी कवयित्री लिहिती तर ती कशी झाली असती ?
(२) कामभावनेकडे (सेक्स) बघण्याचा स्त्रीचा दृष्टीकोन नेमका असतो तरी कसा?
(३) असे म्हटले जाते की पुरुष सेक्ससाठी प्रेम करतो आणि स्त्री प्रेमासाठी पुरुषाला सेक्स करू देते; हे कितपत खरे आहे ?