श्री. विनायक,
आपली प्रतिक्रिया अतिशय वाचनीय आहे. दिलेल्या उदाहरणांवरून आपण एक दर्दी रसिक आहात हे समजले. रोशनची जी दोन कालखंडातली गाणी आपण लिहिली आहेत त्यातली नंतरची जास्त प्रसिद्ध गाणी ऐकूनच आम्ही बरेच दिवस खुष होतो. त्यानंतर अशाच एका रसिकाने ती ५०-६० मधली गाणी ऐकवली. खरं सांगू ? पहिल्यांदा ती एवढी आवडली नाहीत. पण परत परत ऐकल्यावर त्यातला गोडवा जाणवला.
आता स्पष्टच सांगायचे तर ही सर्व मुरलेली मंडळी  नौशादला अतिशय कस्पटासमान मानतात व भरपूर नांवे ठेवतात. हे मला पटले नाही. भले, तो अनिलदा, मदनमोहन यांच्याइतका प्रतिभाशाली नसेल, पण कोणाला हे आवडो वा न आवडो, हिंदी चित्रपटसंगीतावर तो आपली छाप नक्कीच सोडून गेला आहे.