मुलगा की मुलगी हे ओळखायची अगदी सोप्पी युक्ती माझ्या मुलाने तो चारपाच वर्षाचा असताना आम्हाला शिकवली होती.

तो म्हणाला, " मुलाला नाव विचारायचे, मुलाचे सांगितले तर मुलगा, मुलीचे सांगितले तर मुलगी."   अमेरिकी मुलाच्या बाबतीतही ही युक्ती यशस्वी होईल.

माझ्या मुलाची गाय की बैल हे ओळखायची युक्ती पण अफलातून होती.  "गाडीला जोडला असेल तर बैल, नाही तर गाय!"