सरदारजी भारतीय लष्करात सैनिक असतात, आणि 'गरोदर असतात'. ('वी आर प्रेग्नंट' अशा अर्थी... थोडक्यात, बाप होऊ घातलेले असतात.) अशा वेळी 'मुलाचं नाव काय ठेवणार' अशी सह-फौजींकडून पृच्छा होते.

सरदारजींचं लष्करावर फार प्रेम! त्यामुळे काहीही झालं तरी लष्कराशी संबंधितच नाव ठेवायचं, हा निश्चय. म्हणतात, 'बघू या. सुभेदारसिंग, मेजरसिंग नाहीतर जर्नेलसिंग*. यांपैकी बायकोला कुठलं पसंत पडतं बघूया.'

*जर्नेल = जनरल

'पण सरदारजी, समजा मुलगी झाली तर?'

'मग तर सोपं आहे! आर्मर्ड कौर!'