महाराष्ट्रात हल्ली मुलांमुलींत भेदभाव  करत नसल्याने त्याचा प्रभाव हिंदू नावांवर पण पडायला लागला आहे. कांचन, किरण, मुकुल (ही सीकेपी) आणि शिरीष, सुमन ही मुलांमुलींची समाईक नावे  दिसायला लागली आहेत.

उत्तरेत इंदु पुरुष असतो तर  महाराष्ट्रात स्त्री.

गाय-बैल, मुलगा-मुलगी वेगळे कसे ओळखायचे याची आमच्या व्याकरणतज्ज्ञ आजोबांची क्‌ऌप्ती भन्नाट होती.  त्या प्राण्याकडे थोड्यावेळ बघत राह्यचे.  प्राणी उभा राहिला, बसला, चालला तर बैल किंवा मुलगा;  उभी राहिली, बसली, चालली  तर गाय किंवा मुलगी!