छाया ताईंच्या' चांद मातला 'वर सचिनचा लालिमा वाचून त्यावर प्रतिक्रिया देणे गरजेचे वाटले कारण या प्रकारात दाद मागण्यात माझाही सक्रिय सहभाग होता. 'सचिन' च्या प्रतिक्रियेवरून लोकांचा गैरसमज होउ शकतो की त्यांनी सुखासुखी पैसे परत केले. परंतु तसे अजिबात नाही.
कार्यक्रमानंतर ताबडतोब दुसर्या दिवशी मी 'सचिन' ला खरमरीत पत्र लिहिले. त्याकडे सोयिस्कर दुर्लक्ष झाले. त्याच बरोबर जवळजवळ सर्व व्रुत्तपत्रांना लेख लिहिले.'सचिन' च्या पत्रात मी नुकसानभरपाईची मागणी केली होती पण त्याला केराची टोपली दाखवली गेली. म्हणून मी आदेश म्हात्रे या 'सचिनच्या कर्मचार्याना फोन करून मी ग्राहक न्यायालयात जाईन अशी तंबी दिली आणि अहो आश्च्यर्यम!! खुद्द जकातदारांचा मला फोन आला.जवळजवळ अर्धा तास ते मला स्पश्टीकरण देत होते. तेव्हा मी त्यांच्याकडून कबुल करून घेतले की ते आम्हाला दिलगिरीचे पत्र व पैसे चेक ने परत देतील. प्रत्यक्षात मात्र सोयिस्कर दिलगिरी विसरून फक्त चेक दिला. तोही पोचपवतीही नको पण चेक घ्या असा जबरदस्तीने. मी तेव्हाच त्याना सांगितले होते की मी दिलगिरी मिळाल्याशिवाय चेक वटवणार नाही. तरीही त्यानी आपल्या प्रतिक्रियेत चेक न वटवण्याची अनाकलनीय कारणमीमांसा केली. या सर्व प्रकारात माझा वेळ तर गेलाच पण मनस्ताप झाला तो वेगळाच.
यावरून लक्षात येते की त्यानी ग्राहक न्यायालयात गेल्यावर होणारी बदनामी व सगळ्याना पैसे द्यावे लागले तर होणारे नुकसान टाळण्यासाथीच पैसे परत दिले. ते इतके सालस असतील तर त्यानी सहभागी सर्वांचे पैसे परत द्यावे.
जकातदारांची प्रतिक्रिया म्हणजे तोल सुटून, सभ्यतेच्या मर्यादा सोडून केलेले लिखाण आहे.
छायाताईंचा लेख वाचून मिळालेल्या प्रसिद्धीसाथी जकातदारानि आभारप्रदर्शन केले आहे.
अशा प्रसिद्धीने आनंद होणार्या या माणसाची प्रसिद्धीपरायणता ही " घटम भिंद्यात, पटम छिंद्यात, कुर्यात रासभरोहणम!येनकेन प्रकारेण प्रसिद्धो पुरुशो भवेत! या जातकुळीतील आहे हे त्यांच्या प्रतिक्रियेत दिसतेच.त्याबद्दल कायबोलावे?
आमची मशाल कधीच पेटली आहे, फक्त जकातदाराना त्याचा उजेड आता पहायला मिळाला.
या निमित्ताने मी सर्व ग्राहकांना सांगू इछिते की 'कंझुमर फोरम 'ही संस्था आपल्याला मार्गदर्शन करण्यास तत्पर असते.(अल्प व विनामोबदला). मी अनेकदा माझ्या हक्कांकरता त्यांच्या मदतीने यशस्वी लढा दिला आहे. ग्राहकानी याचा जरुर लाभ घ्यावा.
माझी प्रतिक्रिया मी या आधीच लोकसत्तेला पाथवली आहे. परंतु केतकरांनी जागेअभावी(?) ती छापण्यास आधीच नकार दिला आहे. 'सचिन'कडून जे व्यक्तिगतव बेछुट आरोप केले गेले त्याचे उत्तर देण्याची संधी आम्हाला लोकसत्तेने नाकारली त्याचे वाईट वाटते.
या संदर्भात आम्ही आता आशा ताई व यशवंत देव यांना याबद्दल माहिती देण्याचा विचार करत आहोत कारण खरोखरच आशाताई 'सचिन 'बरोबर आणखी कार्यक्रम करणार असतील तर हा प्रकार परत घडणार नाही अशी दक्षता तरी घेतली जाईल.
डॉ. स्वाती परांजपे